रानटी हत्तीचे बंदोबस्त एक आव्हान-देवानंद दुमाने

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो हा उद्योगविरहित जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. सध्या उन्हाळी (रब्बी) पिकाचे हंगाम सुरू आहे.या हंगामात धान व मका पिकाची लागवड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात असते. मका पीक अंतिम टप्प्यात असून काढणीला आलेले असताना ओरिसावरून आपल्या जिल्ह्यात ३ ते ४ वर्षापासून आलेल्या रानटी हत्तीचे कळप धुमाकूळ घालत असून मका पीक नेस्तनाबूत केले जात आहे त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून केली जात आहे. परंतु रानटी हत्ती परतवण्यास वनविभाग व शासन अयशस्वी झाला आहे.रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पश्चिम बंगाल मधून "हुल्ला गँग" या चमूला पाचारण करून रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला यात काही अंशी परतवण्यास यश आले परंतु ते जास्त काळ यशस्वी होऊ शकले नाही. रानटी हत्तीच्या कळपाचे पुन्हा जिल्ह्यात आगमन झाले आहे. या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्याकडून वारंवार केली जात आहे. रानटी हत्तीचा त्रास कमी न होता वाढतच आहे त्यामुळे जिल्ह्यातील फार मोठी समस्या झाली आहे. रानटी हत्तीच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत १० ते १२ लोकांचा मृत्यू झालेला आहे व शेतपिकांची अतोनात हानी केली आहे. शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. रानटी हत्तीचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी जिल्ह्यात सर्वस्तरातून जोर धरू लागली आहे